वांगी पावट्याच्या दाण्याचा भात | Wangi pavte bhat
साहित्य : वाटी तांदूळ (बासुमती ) १ वाटी पावट्याचे दाणे १ वाटी वांग्याच्या फोडी खडा मसाला - २ तमालपत्र ,२-३ दालचिनी,२ चक्रफुल ७-८ म...
https://sheplansdinner.blogspot.com/2019/01/wangi-pavte-bhat.html
साहित्य :
- वाटी तांदूळ (बासुमती )
- १ वाटी पावट्याचे दाणे
- १ वाटी वांग्याच्या फोडी
- खडा मसाला - २ तमालपत्र ,२-३ दालचिनी,२ चक्रफुल ७-८ मिरे
- कडीपत्ता
- १ चमचा लाल तिखट
- १ चमचा गोडा मसाला
- चवीनुसार मीठ
फोडणीसाठी
- २ चमचे तेल
- १ चमचा मोहरी
- १ चमचा जिरे
- १ चमचा हळद
कृती :
- तांदूळ स्वच्छ निट करून धुवून घ्यावा
- कुकर मध्ये तेल गरम करावे त्यामध्ये मोहरी घालावी मिहारी तडतडली कि त्यामध्ये जिरे घालावे ,कडीपत्ता हळद घालावी
- त्यानंतर पावट्याचे दाणे आणि वांग्याच्या फोडी घालाव्यात .फोडणीमध्ये चांगले परतून घ्यावे
- त्यानंतर तांदूळ घालावे .छान मिक्स करावे
- लाल तिखट ,गोडा मसाला ,मीठ घालावे .छान मिक्स करावे
- २ वाट्या पाणी घालून कुकरच्या ३ शिट्या कराव्या.
- ३ शिट्या झाल्या कि कुकर थंड होऊ द्यावा .नंतर ताज्या ताकासोबत ,पापड लोणच्यासोबत सर्व्ह करावे.