बिट कोशिंबीर / Beetroot Koshimbir / Beetroot Salad | She Plans Dinner

बिट कोशिंबीर / Beetroot Koshimbir / Beetroot Salad

Beetroot Koshimbir / Beetroot Salad In English साहित्य : १) २-३ बीट २) ४-५ चमचे शेंगदाण्याच कुठ ३) १ चमचा मीठ ४) १ चमचा साखर ...



Beetroot Koshimbir / Beetroot Salad In English



साहित्य :
१) २-३ बीट
२) ४-५ चमचे शेंगदाण्याच कुठ
३) १ चमचा मीठ
४) १ चमचा साखर
५) पाव चमचा मिरची पावडर
६ ) लिंबू


फोडणीसाठी
१) २-३ चमचे तेल
२)मोहरी
३) जिरे
४) हिंग
६) कडीपत्ता


कृती :

१) बीट स्वच्छ धुवून ,वरची साल कडून खिसणीने खिसून घ्यावे
2) त्यानंतर त्यामध्ये मीठ ,साखर ,शेंगदाण्याच कुठ ,मिरची पावडर घालावे
   थोडा चवीनुसार लिंबू पिळून मिश्रण चमच्याने एकत्र करून घ्यावे .
४) छोट्या कढई मध्ये तेल गरम करावे मोहरी तडतडली कि त्यात जिरे ,हिंग ,कडीपत्ता  घालून  फोडणी करावी .
५ ) फोडणी थंड करून वरील मिश्रणावर घालावी .
आपली बीटाची कोशिंबीर तयार झाली .

बीटाची कोशिंबीर भाकरी ,चपाती सोबत छान लागते .

टीप :
१) लाल मिरची ऐवजी मिरची फोडणी मध्ये घालू शकता .
२) लिंबू ऐवजी दही हि घालू शकता .


Related

salad 4666879074818851707

Post a Comment

emo-but-icon

Subscribe My Youtube Channel

Follow Us On Facebook

Like, Follow & Visit Us :

Instagram

Search Recipe Here

Popular

Recent

item