खजूर लाडू / Khajurache Ladoo /Dates Laddu
Khajur Laddu /Dates Laddu In English साहित्य: 500 gm खजूर, बिया काढून (मिक्सरमध्ये भरडसर वाटून १ कप) 3 टेस्पून तूप १ टीस्पून ...
https://sheplansdinner.blogspot.com/2018/01/khajurache-ladoo-dates-laddu.html
Khajur Laddu /Dates Laddu In English
500 gm खजूर, बिया काढून (मिक्सरमध्ये भरडसर वाटून १ कप)
3 टेस्पून तूप
१ टीस्पून खसखस
कृती:
1. खजुराच्या बिया काढून खजूर मिक्सरमध्ये भरडसर वाटून घ्यावे.
2. नॉनस्टिक पॅनमध्ये तूप गरम करावे त्यात खसखस घालून काही सेकंद परतावे. त्यात भरडसर वाटलेले खजूर घालून मंद आचेवर गरम करावे.
3.तुपात खजूर ,खसखस नीट मिक्स झाले कि थाळीमध्ये काढून ठेवावे. हाताच्या तळव्यांना थोडे तूप लावून मिश्रण कोमटसर असतानाच लाडू बांधावेत.
4. गुलामजाम इतका छोटे लाडू बनवावा .
Watch खजूर लाडू | khajur laddu | dates laddu Recipe on Youtube
टीप :
या लाडू मध्ये तुम्ही
१. सुखे खोबरे अर्धा वाटी भाजून घालू शकता
२.त्यानंतर बदाम ,काजू ,बारीक करून घालू शकता
खजुरामध्ये पोषण तत्वांचे मोठे भांडार आहे. चांगले फ्रुट आहे. लोह, खनिज, कॅल्शिअम, अमीनो अॅसिड, फॉस्फोरस, व्हिटॅमिन याची अधिक मात्रा खजूरमध्ये असते. त्यामुळे खजूर आरोग्याला अधिक लाभदायक असतो.खजूर उष्ण असतात एक लाडू आणि त्यावर ग्लासभर दुध प्यायल्यास शरीराला भरपूर उष्मांक मिळतात.