Spring onion recipe / कांद्याच्या पातीची भाजी
साहित्य : एक जुडी कांद्याची पात , एक वाटी बेसन (हरभरा डाळीचं) पीठ , एक चमचा लाल मिरचीचे तिखट , फोडणीसाठी ...
https://sheplansdinner.blogspot.com/2018/01/spring-onion-recipe.html
साहित्य :
एक जुडी कांद्याची पात,
एक वाटी बेसन (हरभरा डाळीचं) पीठ,
एक चमचा लाल मिरचीचे तिखट,
फोडणीसाठी
एक टेबलस्पून तेल,
एक चमचा जिरे,
एक छोटा चमचा मोहरी ,
अर्धा चमचा हळद,
चिमुटभर
हिंग
चवीनुसार मीठ
कृती :
1.
कांद्याच्या पातीपासून कांदे वेगळे काढावेत .स्वच्छ धुवून बारीक चिरावे
2.
पात स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी .
3.
गॅसवर एका कढईत फोडणीसाठी तेल गरम करून घेऊन जिरं-मोहरी ,हिंग हळद फोडणी करावी.
4.
बारीक चिरलेला कांदा आणि चिरलेली पात दोन्ही
फोडणीमध्ये घालून चांगली परतावी
5.
त्यावर ताठ झाकून एक वाफ आणावी .
6.
त्यानंतर
उलथण्याने मिश्रण हलवावं.आणि त्य्मध्ये
लाल मिरचीचे तिखट आणि चवीपुरते मीठ घालून
पुन्हा चांगली भाजी परतावी
7.
थोडासा पाण्याचा हबका मारावा आणि कांद्याची
पात चांगली ३-४ मिनिटे शिजून द्यावी
8.
त्यानंतर
तिच्यात डाळीचं पीठ घालावं .पूर्ण
भाजीला पीठ लागेपर्यंत भाजी हलवावी
9.
कढईवर झाकण ठेवून पाच
मिनिटं वाफ येऊ दयावी.
10.
आपली
कांद्याच्या पातीची भाजी तयार झाली