तिळगुळ लाडू | Tilache Ladu | Sesame Seeds Ladoo | Tilgul ladu |Sankrant Special Recipe | Indian Sweets
Tilache Ladu Recipe In English साहित्य : २५० ग्रम तिळ २५० ग्रम चिकीचा गूळ १ वाटी शेंगदाण्याचे जाडसर कूट १ चमचा वेलची पूड १ ते...
https://sheplansdinner.blogspot.com/2018/01/tilache-ladoo-sesame-seeds-ladoo-tilgul.html
Tilache Ladu Recipe In English
साहित्य:
२५० ग्रम तिळ
२५० ग्रम चिकीचा गूळ
१ वाटी शेंगदाण्याचे जाडसर कूट
१ चमचा वेलची पूड
१ ते २ चमचे तूप
कृती:
१) २५० ग्रम तिळ व्यवस्थित भाजून घ्यावेत.
२) कढई मध्ये चिकीचा गुळ घ्यावा .त्यात १-२ चमचे तूप घालावे .
गूळाचा गोळीबंद पाक करावा. सतत ढवळत राहावे, गूळ पूर्ण पातळ झाला कि थोड्या वेळाने तो फेसाळतो.
३) पाक झाला आहे कि नाही हे पाहण्यासाठी एका वाटीत गार पाणी घ्यावे. त्यात एक थेंब पाक घालावा. बोटाने तो पाक हातात घेऊन त्याची गोळी करावी आणि वाटीतल्या पाण्यात तो गोळा खडा मारल्यासारखा टाकावा. जर वाटीचा "टण्णं" असा आवाज आला तर पाक तयार आहे असे समजावे.
४) एका बाऊल मध्ये भाजलेले तीळ ,शेंगदाण्याचे जाडसर कूट,वेलची पूड एकत्र करावे.
हे मिश्रणगुळाच्या पाकात घालवे आंनी निट ढवळावे.
५) आणि गरम असतानाच लाडू वळावेत. लाडू वळताना हाताला थोडे तूप किवा पाणी लावावे ज्यामुळे गरम मिश्रण हाताला चिकटणार नाही.
Youtube वरती पहा तिळगुळ लाडूची रेसिपी
टीप :
लाडू मध्ये आवडत असेल तर भाजून घेतलेले खोबरे ,काजू ,मनुके ,खारीक पावडर घातली तरी चालेल.