चटपटीत कारले / कारल्याचे चिप्स / क्रिस्पी कारले फ्राय चिप्स / crispy karela fry | She Plans Dinner

चटपटीत कारले / कारल्याचे चिप्स / क्रिस्पी कारले फ्राय चिप्स / crispy karela fry

कारल्याची भाजी म्हटली, की अनेकांना ती आवडत नाही. त्यामुळे ही नवीन डीश अशा लोकांना कारल्याच्या प्रेमात पाडू शकते. लहान मुलेही क्रिस्पी क...



कारल्याची भाजी म्हटली, की अनेकांना ती आवडत नाही. त्यामुळे ही नवीन डीश अशा लोकांना कारल्याच्या प्रेमात पाडू शकते. लहान मुलेही क्रिस्पी कारले फ्राय मजेने खाऊ शकतात. ही डीश तयार करण्यापूर्वी कारल्याला मिठ आणि हळद यात मॅरिनेट करावे लागते. त्यानंतर चटपटीत मसाल्यासोबत मिक्स करून तेलात फ्राय करावे लागते. जाणून घ्या क्रिस्पी कारले फ्राय तयार करण्यासाठी कोणती सामुग्री लागते, आणि याची खास पाककृतीही...

साहित्य :
१)  ३/४ (२५० Gram )कारले
२) ३ हिरव्या मिरच्या
३) २ लिंबू
४) २ कांदे
५)चवीनुसार मीठ
६) तेल

फोडणीसाठी :
तेल ,जिरे ,हिंग हळद


कृती:
१) कारले स्वच्छ धुवून ,पुसून घ्यावे .त्यानंतर गोल गोल चकत्या करून,त्यातील बी काढून टाकावे .

२)कांदे बारीक चिरून घ्यावे .
३)मिरची चिरून घ्यावी .लिंबूहि चिरून घ्यावेत .
४) त्यानंतर कढईमध्ये २-३ चमचे  तेल घ्यावे ,त्यात जिरे हिंग ,हळद घालावे
त्यानंतर कांदा ,हिरवी मिरचीचे काप  घालावे आणि चांगल परतून घ्यावे
५ )आता कारल्याचे काप,आणि लिंबू  घालावे
६) चवीनुसार मीठ घालावे आणि कारले पूर्ण भाजेपर्यंत  मंद आचरेवर फ्राय करावे .
साधारण १२- ते १५ मिनिट मध्ये चटपटीत कारले तयार होते .


चपाती ,भाकरी सोबत तोंडी लावायला छान लागते .नुसते हो चटपटीत म्हणून खाऊ शकतो

Related

Veg Recipe 9218108224340728880

Post a Comment

emo-but-icon

Subscribe My Youtube Channel

Follow Us On Facebook

Like, Follow & Visit Us :

Instagram

Search Recipe Here

Popular

Recent

item