भोगीची मिक्स भाजी / Bhogichi Bhaji | She Plans Dinner

भोगीची मिक्स भाजी / Bhogichi Bhaji

साहित्य: १) १/२ वाटी पावटा २)  २-३ मध्यम आकाराची वांगी ३) १/२ वाटी वाटाणे ४) १/४ वाटी ओले हरबरे   ५) ४-५ छोटे काप शे...




साहित्य:
१) १/२ वाटी पावटा
२)  २-३ मध्यम आकाराची वांगी
३) १/२ वाटी वाटाणे
४) १/४ वाटी ओले हरबरे  
५) ४-५ छोटे काप शेवग्याची शेंग 
६) १/४ गाजराचे तुकडे 
७) १ वाटी बटाट्याच्या फोडी  
८) २ कांदे 
९) १ टोमॅटो 
१०)आंल लसूण पेस्ट 
११) भाजून घेलेले तीळ कुट 
१२)खोबर भाजून घेतलेले 
१3) काळा मसाला 

१४))शेंगदाणे कुट 
१६) १ छोटा चमचा गूळ 
१७) तेल 
१८ )चिंचेचा कोळ  
१९)१ चमचा लाल तिखट

२०) मीठ चवीनुसार 
२१ ) कोथिंबीर 

कृती :

१)एका भांडयात तेल गरम करून त्यात प्रथम कांदा ,खोबर लालसर भाजून घ्यावे.
याची मिक्सर वरून पेस्ट करून घावी 
२)त्यानंतर कुकर मध्ये तेल घ्यावे त्यात आल -लसून पेस्ट घालावी त्यांनात्र कांदा -कोबर पेस्ट घालावी .चिरलेला टोमॅटो घालून मिश्रण परतावे चांगल 
३)त्यानंतर तीळाच ,शेंगदाण्याचे कुट घालावे चांगले परतून घ्यावे. आता लाल तिखट काळा मसाला घालावा 
१ मिनिट कुकरचे झाकण लावून ठेवावे ,मस्त तेल सुटेल 
४) त्यानंतर पावटा,हरबरे ,मटार,गाजराचे तुकडे ,बटाटाच्या फोडी घालून मिक्स करावे .चांगल्या परतून घ्यावे .५ मिनिट चांगली वाफ आणावी 
५)त्यानंतर वांगी ,शेवग्याच्या शेंगा घालाव्यात .(सगळ्यात शेवटी घालण्याचे कारण वांगी आणि शेवगा दोन्ही लवकर शिजते )पुन्हा चांगल परतून घ्यावे .
६)शेवटी चवीनुसार मीठ घालावे .चिंचेचा कोळ ,गुळ दोन्ही  घालावे .
७)एक दीड ग्लास पाणी घालावे . भाजी मस्त हालवावी 
८)कुकरचे झाकण लावून एक शिटी करून घ्यावी 

९)भाजी शिजली की ग्यासवरुन बाजूला करावी. 





वरुन बारीक़ चिरलेली कोथिंबीर घालून  तांदुळाच्या भाकरी /बाजरीच्या भाकरी /ज्वारीच्या  भाकरी सोबत सर्व्ह करावी.


Related

Veg Sabji 530319957761317289

Post a Comment

emo-but-icon

Subscribe My Youtube Channel

Follow Us On Facebook

Like, Follow & Visit Us :

Instagram

Search Recipe Here

Popular

Recent

item