पालक पराठे स्टफड विथ पोट्याटो / Palak Paratha with stuffed with Potato
साहित्य : १) १ पालक जुडी २) 5-6 हिरव्या मिरच्या ३) १ चमचा धने पावडर ४) १ चमचा जीरा पावडर 5) २ चमचा लाल मिरची पावडर...
https://sheplansdinner.blogspot.com/2018/01/palak-paratha-with-stuffed-with-potato.html
१) १ पालक जुडी
२) 5-6 हिरव्या मिरच्या
३) १ चमचा धने पावडर
४) १ चमचा जीरा पावडर
5) २ चमचा लाल मिरची पावडर
6) आलं -लसून पेस्ट २ चमचे
७) मैदा १ वाटी
७)गव्हाचं पीठ ३ वाटी
८) तेल छोटी वाटी
९) 5-6 medium साईझ बटाटे (potato )
10) चवीनुसार मीठ
कृती :
पालक पराठे पीठ तयार करण्यासाठी :
१)पालक स्वच्छ धुवून ,गरम पाण्यात उखळून घ्यावा .
२)उखळून घेतलेला पालक थंड झाला कि मिक्सर वरून बारीक करून घ्यावा
३) १ वाटी मैदा ,३ वाट्या गव्हाचे पीठ एकत्र करावे
त्यामध्ये १ चमचा लाल मिरची पावडर ,१ चमचा मिरची पावडर ,चवीनुसार मीठ ,धना पावडर ,जीरा पावडर,आलं लसून पेस्ट २ चमचे घालावे .
४) त्यांतर मिक्सर वरून काढलेली पालकची पेस्ट घालून पीठ घट्ट मळावे .
Stuffing साठी पोट्याटो (Potato) सारण :
१) बटाटे स्वच्छ धुवून शिजण्यासाठी कुकरला लावावेत (साधारण ४ शिट्या केल्या कि बटाटे छान शिजतात )
२) बटाटे शिजल्यावर कुकर थंड झालं कि बटाट्याचे वरचे साल काढावे .
३) मिक्सर वरून मिरची वाटून घ्यावी .
४)बटाटे एका बाऊल मध्ये कुसकरून घ्यावा .त्यामध्ये १ चमचा वाटून घेतलेली मिरची ,चवीनुसार मीठ ,१ चमचा आला मिरची पावडर घालाची
5) मस्त मिश्रण एकत्र करून चांगल मळून घ्यावे .
6) हे आपले stuffing साठी मिश्रण तयार झाले .
पराठ्याची कृती :
१) पालकचे घट्ट मळलेल्या पिठाचा लिंबाच्या आकाराचा गोळा घ्यावा
आणि छोटा पराठा लाठावा
२)त्यानंतर बटाट्याच्या सारणाचा छोटासा गोळा करून घ्यावा .
आणि तो छोट्या लाटलेल्या पराठ्यामध्ये ठेवून चारी बाजूनी बंद करून उंडा बनवावा .
३) आणि आता अलवार पराठा लाठावा .
गॅस वर तवा ठेवून पराठा दोन्हा बाजूनी भाजावा .
आपला पालक पराठे स्टफड विथ पोट्याटो तयार झाला आहे ..पराठ्यावर तूप किवा butter घालून टोमाटो सॉस सोबत सर्व्ह करावे .