ओल्या हळदीचे लोणचे | Turmeric Pickle |Turmeric root pickle
Olya haldiche lonche / Turmeric pickle in English ओल्या हळदीचे लोणचे |Turmeric Pickle सा हित्य: 200 ग्रम ओली हळद ५० ग्रम ...
https://sheplansdinner.blogspot.com/2017/12/turmeric-pickle-turmeric-root-pickle.html
Olya haldiche lonche / Turmeric pickle in English
ओल्या हळदीचे लोणचे |Turmeric Pickle
फोडणीसाठी: २ वाटी सरसोचे तेल /मोहरीच तेल
कृती :
३. .आल्याचेही साल काढून खिसून ,बारीक मिक्सर वरून भरड काढावी
ओल्या हळदीचे लोणचे |Turmeric Pickle
साहित्य:
200 ग्रम ओली हळद
५० ग्रम किसलेले आले
दोन लिंबाचा रस
३ मोठे चमचे मीठ
एक -दीड चमचा लाल मिरची पावडर
२५ ग्रम मोहोरी
दोन चमचे मेथी दाणे
कृती :
१.ओली हळद स्वच्छ धुवून सोलावी व गोल चकत्या करून घ्यावात .नंतर त्याचे बारीक उभे काप करावे.
२.ओल्या हळदीचे काप केल्यावर त्याला थोडसं पाणी सुटतं ,ते सुती कपड्याने टिपून घ्यावे .त्यासाठी 5 मिनिट हळदीचे काप घट्ट बांधून ठेवावी म्हणजे सगळा पाण्याचा अंश निघून जाईल.
३. .आल्याचेही साल काढून खिसून ,बारीक मिक्सर वरून भरड काढावी
४. त्यानंतर कढई मध्ये मोहरी गरम करावी .मोहरीचे दाण्याचा तडतडल्यासारखा आवाज यायला लागला कि गस बंद करावा आणि मेथीचे दाणे त्यामध्ये टाकावे .आणि 5 मिनिट हलवावे .मेथीही मस्त गरम होईल.
५.मेथी आणि मोहरीचे मिश्रण थंड झाले कि मिक्सर वरून भरड काढावी
६.आता एका बाऊल मध्ये आल्याचे काप घ्यावे .त्यात आल घालावं .लिंबाचा रस ,मीठ ,लाल मिरची पावडर ,मेथी आणि मोहरीची भरड घालावी आणि लोणच्याचे मिश्रण हालवावे .
७ .कढई मध्ये मोहरीचं तेल गरम करायला ठेवावं ,
८.तेल गरम झाले कि 5 मिनिट तेल थंड करून वरील मिश्रणावर ओतावे .आणि पुन्हा मिश्रण हलवावे .
९. स्वच्छ धुऊन ,पुसून उन्हात वाळवून घेतलेली बरणी घ्यावी आणि हळदीचे लोणचे त्यात भरावे .
10. हे लोणचे लगेच खायला घेतले तरी चालते. तसेच हवाबंद बरणीत किवा दिवस फ्रिजमध्ये सहज टिकते.
टीप :
१.हळदीचे साल काढताना हात पिवळे होतात ,त्यासाठी हाताला तेल लावून ओल्या हळदीचे साल काढावे किवा प्लास्टिकची ब्याग हाताला बांधून साल काढावी .
२.मोहरीच्या ऐवजी बाजारात मिळते ती मोहरीची डाळ हि आपण वापरू शकतो .
३.ओल्या हळदीचे उभे काप करण्या ऐवजी खिसून हि लोणचे करू शकतो .