मेथांबा - Methamba | She Plans Dinner

मेथांबा - Methamba

साहित्य : १ कप सोललेल्या कैरीचे लहान तुकडे १/२ कप गूळ १ टिस्पून मेथी दाणे १ टिस्पून तेल १ टिस्पून मोहरी १/४ टिस्पून हळद ...









साहित्य :
  • १ कप सोललेल्या कैरीचे लहान तुकडे
  • १/२ कप गूळ
  • १ टिस्पून मेथी दाणे
  • १ टिस्पून तेल
  • १ टिस्पून मोहरी
  • १/४ टिस्पून हळद
  • चिमटभर हिंग 
  • १ टिस्पून लाल तिखट
  • चवीपुरते मिठ
  • १/२ कप पाणी

कृती:
१) कढई मध्ये तेल गरम करावे,  त्यात मोहोरी, हिंग, हळद, घालावी त्यानंतर मेथी दाणे घालून परतावे. मेथीदाणे परतले गेले कि लाल तिखट घालून फोडणी करावी. 
२)लगेच कैरीच्या फोडी घालून मंद आचेवर कैरी चांगली मिक्स करावी 

३) त्यानंतर पाणी घालावे. चवीपुरते मिठ घालावे. झाकण ठेवून  काढावी. 



४) कैरीच्या फोडी शिजल्या कि त्यात गूळ आणि थोडे पाणी घालावे. 

मंद आचेवर मिश्रण घट्टसर होईस्तोवर शिजू द्यावे. पाक आवडीनुसार घट्ट किंवा पातळ ठेवावा.

Related

Summer Special Recipes 5907186733822588144

Post a Comment

emo-but-icon

Subscribe My Youtube Channel

Follow Us On Facebook

Like, Follow & Visit Us :

Instagram

Search Recipe Here

Popular

Recent

item