सुरळीच्या वड्या | suralichya vadya | She Plans Dinner

सुरळीच्या वड्या | suralichya vadya

गेले काही दिवस घरातून फरमाइश  होती सुरळीच्या वड्या खायची इच्छा होतेय तर मग काय बनवली खूप सोपी, झटपट आणि अगदी मऊसर होणाऱ्या सुरळी...


गेले काही दिवस घरातून फरमाइश  होती सुरळीच्या वड्या खायची इच्छा होतेय तर मग काय बनवली खूप सोपी, झटपट आणि अगदी मऊसर होणाऱ्या सुरळीच्या  वड्या🥰

चला मग तुम्हाला पण रेसिपी इथे देऊन टाकते😉

🍛 सुरळीच्या वड्या – रेसिपी

साहित्य :

सुरळीच्या वड्या बनवण्यासाठी पीठ बनवून घेण्याचे साहित्य :
बेसन – १ कप
दही – ½ कप (आंबट असेल तर उत्तम)
पाणी – १ ते १¼ कप (गरजेनुसार)
हळद – ¼ टीस्पून
आलं--हिरवी मिरची पेस्ट – १ टीस्पून ( आवडत असेल तर लसूण पण घालू शकता ,मी घातला नव्हता)
मीठ – चवीनुसार
तेल – १ टीस्पून
लिंबाचा रस – १ टीस्पून (दही जर जास्त आंबट असेल तर लिंबू नाही घातला तरी चालेल)
चिमूटभर हिंग

फोडणीसाठी :
तेल – २ टीस्पून
मोहरी – ½ टीस्पून
जिरे – ½ टीस्पून
कढीपत्ता – ७-८ पाने

गार्निश :
ओले किसलेलं खोबरं
बारीक चिरलेली कोथिंबीर

👩🏻‍🍳 कृती :

१) सुरळीच्या वड्या  करण्यासाठी सगळ्यात आधी पीठ तयार करून घेण्याची कृती :

1. एका भांड्यात बेसन + दही + हळद + मीठ + लिंबाचा रस + पेस्ट + हिंग घाला. पाणी घालून मिक्सर वरून चांगल फेटून घ्या

मिश्रण हे गाठी नसलेलं पातळ आणि गुळगुळीत असे पीठ तयार होईल.

2. जाड बुडाची कधी घेऊन हे मिश्रण गॅसवर मंद ते मध्यम आचेवर शिजवा.
3.सतत ढवळत रहा. ४–५ मिनिटांनी ते घट्ट होऊ लागेल.
4.मिश्रण पसरण्याइतक घट्ट झालं की  गॅस बंद करा.

आता सुरळीच्या वड्या पसरवणे  साठी
1) उलट्या ताटांवर किंवा स्टीलच्या प्लेट्सवर हलकं तेल लावा.
2)गरमागरम मिश्रण पातळ पसरवा. थोडस पीठ ताटावर टाकून हाताने सारवल्यासारखे पसरवले तरी चालेल..
3) 10 मिनिटांनी थंड झाल्यावर सुरीने लांब पट्ट्या कापा.
4) त्यावर ओले खोबरे ,कोथिंबीर पसरा
5). हळूवार गुंडाळून रोल करा.

छान सुरळीच्या वड्या बनवून झाल्या की त्यावर फोडणी  द्यायची..

एका कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, कढीपत्ता, मिरच्या तडतडवा.
आता ही तयार रोलवर ही फोडणी घाला.
वरून किसलेलं खोबरं आणि कोथिंबीर पेरा.

झाल्या आपल्या मस्त टेस्टी सुरळीच्या वड्या😍

✨ परफेक्ट सुरळीच्या वड्या टिप्स :

मिश्रण शिजवतांना सतत ढवळणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
दही थोडं आंबट असेल तर चव अप्रतिम येते.
मिश्रण खूप घट्ट झालं तर थोडं गरम पाणी घालून परत ढवळा.
गरम असताना पसरवलं तर वड्या उत्तम रोल होतात.
@सोनाली कुलकर्णी


Youtube | instagram | Facebook

 @ She Plans Dinner 

#sundayspecial  #explorepage #RecipeOfTheDay #recipeideas #सुरळीच्यावड्या  #highlight #followers


Post a Comment

emo-but-icon

Subscribe My Youtube Channel

Follow Us On Facebook

Like, Follow & Visit Us :

Instagram

Search Recipe Here

Popular

Recent

item