उपवासाचे शाबूदाणा आप्पे | Sabudana Appe Recipe | Sago Fritter
साहित्य : १) १ वाटी शाबूदाणा २) १ कप दही ३) १-२ उकडलेले बटाटे ४) २ हिरव्या मिरच्या आणि आलं यांची पेस्ट ५) शेंगदाण्याचे कुट ६) १...
https://sheplansdinner.blogspot.com/2018/06/sabudana-appe-recipe-sago-fritter.html
साहित्य :
१) १ वाटी शाबूदाणा
२) १ कप दही
३) १-२ उकडलेले बटाटे
४) २ हिरव्या मिरच्या आणि आलं यांची पेस्ट
५) शेंगदाण्याचे कुट
६) १ चमचा साखर
७) १ चमचा जिरे
८) १/२ चमचा लाल मिरची पावडर
९) ६-७ चमचे तूप किवा तेल
१० ) मीठ चवीनुसार
११) कोथिंबीर
१२) साबुदाणा वरी च पीठ 1/2 कप
कृती :
१) शाबूदाणा पूर्ण रात्रभर किवा ६-७ तास भिजून घ्यावा .
२) शाबूदाणा चांगला भिजला कि त्यातील जास्तीचे पाणी काढून काढावे .
३) एक मोठा बाऊल मध्ये दही ,साखर ,मीठ ,हिरवी मिरची आलं पेस्ट घालावी आणि चांगले मिक्स करून घ्यावे .
४)आता भिजवलेला शाबूदाणा ,शेंगदाण्याचे कुट ,उकडलेला बटाटा ,जिरे ,कोथिंबीर ,लाल मिरची पावडर,
साबुदाणा वरी च पीठ 1/2 कप घालून हांताने चांगले मिक्स करावे
६) आप्पे पात्र गरम करायला ठेवावे .गरम झाल्यावर तेल किवा तूप प्रत्येक होलला लावावे
चमच्याने आप्पे त्या प्रत्येक होल मध्ये घालावे .
७) झाकण लाऊन ३-४ min मेडीयम फ्लेम वर आप्पे भाजावे .
८)त्यानंतर झाकण काढून आप्पे पलटावे आणि दुसर्या बाजूनेही छान भाजून घ्यावे .
९)दोन्ही बाजूने आप्पे भाजून झाल्यावर आप्पे दही किवा कोणत्याही चटनी सोबत सर्व्ह करावे