दुधी भोपळ्याचे सूप /Bottle gourd Soup / Lauki ka soup / Dudhi bhopla soup / Diet Soup Recipe
Bottle-gourd-soup /dudhi bhopala soup in English दुधी भोपळा हि औषधी भाजी असून त्यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे आहेत.वजन कमी...
https://sheplansdinner.blogspot.com/2018/06/bottle-gourd-soup-lauki-ka-soup-dudhi.html
Bottle-gourd-soup /dudhi bhopala soup in English
दुधी भोपळा हि औषधी भाजी असून त्यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे आहेत.वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबतच संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.
वजन कमी करण्यात सर्वात फायदेशीर दुधी भोपळा आहे. यामध्ये 96 टक्के पाणी असते. 100 ग्रॅम भोपळ्यामध्ये केवळ 12 कॅलरी असतात, म्हणजेच याच्या सेवनाने तुम्ही कमी कॅलरी कंझ्युम करून वजन कमी करू शकता.
फक्त दुधी भोपळा खाताना तो आधी टेस्ट करून पहावा जर तो कडवट असेल तर तो शरीरास हानिकारक असू शकतो
साहित्य :
- १ लांब दुधी भोपळा
- २ छोटे चिरून घेतलेले कांदे
- ४-५ लसून पाकळ्या
- आल्याचा छोटा तुकडा
- काळे मिरे पावडर १/२ चमचा
- १ -२ चमचे बटर
- अर्ध्या लिंबाचा रस
- मीठ चवीनुसार
कृती :
१) दुधी भोपळा स्वच्छ धुवून घ्यावा .वरील साल काढून बारीक काप करावे .
२) प्रेशर कुकर मध्ये दुधी भोपळ्याचे काप ,चिरलेला कांदा ,आलं ,लसून घालवे
३) २ कप पाणी घालावे आणि कुकरचे झाकण लावून ३-४ शिट्या कराव्या .
४) शिट्या झाल्यावर कुकर थंड होऊ द्यावा शिजवून घेतलेले मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची प्युरी करून घ्यावी .
५) एका कढई मध्ये १ चमचा बटर घालून त्यामध्ये वरील प्युरी घालावी .हवे असेल तर गरजेनुसार पाणी घालावे .मिश्रण चांगले ढवळावे
६) चांगली उखळी ययला लागली कि त्यामध्ये काळी मिरी पावडर ,आणि चवीनुसार मीठ ,लिंबू रस घालावे .
७) मिश्रण चांगले हलवावे आणि सूप सर्व्ह करावे .