कलिंगडाची खीर | Watermelon Kheer
साहित्य : १ कप कलिंगडाचा पांढरा खिसलेला भाग १ कप लाल कलिंगडाचे काप १/२ वेलची पावडर बदाम आननी काजूचे काप १ कप साखर १/२ लिटर दुध ...
https://sheplansdinner.blogspot.com/2019/05/watermelon-kheer.html
१ कप कलिंगडाचा पांढरा खिसलेला भाग
१ कप लाल कलिंगडाचे काप
१/२ वेलची पावडर
बदाम आननी काजूचे काप
१ कप साखर
१/२ लिटर दुध
कृती :
१) सगळ्यात पहिले कलिंगडाचे पाठीमागचे हिरवे साल काढून पांढरा भाग खिसणीने खिसून घ्यावा
२) आणि लाल कलिंगडाचे काप करून घ्यावे
३) कढई मध्ये दुध गरम करावे
४) दुध गरम झाले कि त्यामध्ये कलिंगडाचा खिसणीने खिसून घेतलेला पांढरा भाग घालावा आणि चांगल हालवून झाकण लावून २-३ मिनिट शिजवून घ्यावे
५) त्यानंतर लाल कलिंगडाचे काप ,बदाम आननी काजूचे काप घालावे .सगळ चांगल मिक्स करावे झाकण लावून ५-७ मिनिट चांगले शिजवून घ्यावे
६)झाकण काढून आता यामध्ये साखर आणि वेलची पावडर घालावी आणि ५ मिनिट पुन्हा चांगल शिजवून घ्यावे
७) आपली कलिंगडाची खीर तयार झाली आहे