6 महिन्यापर्यन्त टिकणारी सँडविच चटणी| Green chutney for sandwich | Mint coriander sandwich chutney |
sandwich chutney recipe in English
पुदिना कोथिंबीर चटणी
साहित्य :
१ बाउल कोथिंबीर ,
१ बाउल पुदिना
४ हिरव्या मिरच्या
२ चमचे खारी बुंदी
१ १/२ लिंबाचा रस
आमचूर पावडर १ चमचा
जिरा पावडर १ चमचा
१/२ चमचा हळद
१ चमचा मीठ
१ चमचा काळ मीठ
अर्धा इंच आलं
कृती :
कोथिंबीरची पानं, पुदिन्याची पान स्वच्छ धुवून घ्यावे .सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घ्यावे .
मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून सर्व एकत्र बारीक वाटून चटणी बनवावी
हि चटणी सर्व प्रकारच्या चाट साठी भेळपुरी साठी,सँडवीच, बिरयाणी पराठे, पकोडे,सामोसा वडापाव सोबत सर्व्ह करू शकता
ह्या चटणी मध्ये आमचूर पावडर ,हळद आणि लिंबू रस घातल्याने हि चटणी फ्रिज मध्ये ६ महिन्यापर्यत छान टिकते
▬▬▬▬▬▬▬ Social Media Links ▬▬▬▬▬▬▬ Facebook ➔ https://www.facebook.com/VegRecipesSheplansdinner/ Instagram ➔ http://instagram.com/Sheplansdinner/ Twitter ➔ https://twitter.com/plansshe Pinterest ➔ https://www.pinterest.com/sheplansd Subscribe here ➔https://www.youtube.com/sheplansdinner ▬▬▬▬▬▬▬ Please Follow | share | Like Subscribe above social media links ▬▬▬▬▬▬▬