Alu vadi /अळू वडी / maharashtrian-recipe
साहित्य अळूवड्यांची 4 पाने (भाजीचं आणि वड्यांचं अळू वेगळं असतं, ते पारखून, विचारून घ्यावं.) १/२ वाटी हरभरा डाळीचे पीठ १ चमचा तांद...
https://sheplansdinner.blogspot.com/2018/10/alu-vadi-maharashtrian-recipe.html
साहित्य
- अळूवड्यांची 4 पाने (भाजीचं आणि वड्यांचं अळू वेगळं असतं, ते पारखून, विचारून घ्यावं.)
- १/२ वाटी हरभरा डाळीचे पीठ
- १ चमचा तांदूळ पीठ
- चवीनुसार मीठ
- जिरे पावडर १ छोटे चमचा
- पांढरे तीळ १ चमचा
- चिंचेचा कोळ १/४ वाटी
- 1 चमचे किसलेला गूळ/साखर
- तळण्यासाठी तेल
- 2 चमचे लाल तिखट
- चिमूटभर हळद
- चिमूटभर हिंग
- ओलं खोबरं
- कोथिंबीर
पाककृती
- प्रथम डाळीच्या पिठात ,तांदूळ पीठ , लाल तिखट, मीठ, तीळ, जिरे पावडर , हळद, हिंग, चिंचेचा कोळ, गूळ घालून एकजीव करून घ्यावे.
- थोडे पाणी घालून घट्टसर भिजवून घ्यावे. फार पातळ करू नये.
- अळूची पाने स्वच्छ धुवून पुसून घ्यावी. देठ कापून टाकणे. पानाच्या मागील बाजूवर मिश्रणाचा वरील मिश्रणाचापातळ थर हाताने पसरावा.त्यावर दुसरे पान उलटे ठेवावे आणि त्यावरही मिश्रण पसरावे.
- अशा प्रकारे एकावर एक ४ पानांवर मिश्रण पसरून दोन्ही बाजूने आत पान दुमडून छान रोल करावा.रोल करताना मध्ये मध्ये मिश्रण लावावे
- कुकर मध्ये नेहमी प्रमाणे पाणी घालावे आणि कूकरच्या भांड्याला तेल लावून रोल ठेऊन कुकरमध्ये शिट्टी न लावता १०-१५ मिनिटे वाफेवर रोल शिजवून घ्यावा.
- वाफवलेली आळू वडी थंड झाल्यावर उभे काप करून गरम तेलात कुरकुरीत तळून घ्यावे किंवा शॅलो फ्राय करून घ्यावे.
- आळू वडी सर्व्ह करताना ओलं खोबरं आणि कोथिंबीर पसरवावी.