Phirni-rice-khir-maharashtrian-recipes / तांदळाची खीर
साहित्य 1/3 वाटी चांगल्या प्रतीचा तांदूळ 1/2 लिटर दूध १ वाटी (भरून) साखर २ चमचे बदाम व काजूचे काप, १ चमचा बेदाणा १ १ /२ चमचे वेल...
https://sheplansdinner.blogspot.com/2018/10/phirni-rice-khir-maharashtrian-recipes.html
साहित्य
- 1/3 वाटी चांगल्या प्रतीचा तांदूळ
- 1/2 लिटर दूध
- १ वाटी (भरून) साखर
- २ चमचे बदाम व काजूचे काप,
- १ चमचा बेदाणा
- १ १ /२ चमचे वेलदोडा पूड
- १ वाटी पाणी
पाककृती
- सगळ्यात आधी दुध गरम करून घ्यावे
- तांदूळ ३-४ मिनिट कढई मध्ये गरम करून घ्यावे .
- तांदूळ थंड झाले कि ते मिक्सर वरून बारीक रवा करून घ्यावा.
- एका पातेल्यामध्ये प्रथम १ वाटी पाणी गरम करावे
- पाणी चांगले उखळले कि त्यामध्ये मिस्कर वरून बारीक करून घेतलेला तांदूळ घालावा .
- तांदूळा मधील कमी व्ह्यायला लागले कि त्यामध्ये गरम दुध घालावे आणि चांगले मिश्रण हालवावे .
- त्यामध्ये काजू ,बदाम ,वेलदोडा पूड घालावी .(चारोळ्या असतील तर त्याही घालाव्या )
- चांगले ढवळून घ्यावे .आणि रवा शिजला आहे कि नाही हे बोटाने दाबून बघावे.रवा शिजला कि त्यामध्ये साखर घालावी
- खीर दाटसर होईपर्यंत ढवळावे.
- चपाती पुरी सोबत गरम किवा फ्रीजमध्ये ठेवून थंड करून सर्व्ह करावी