मक्याच्या दाण्याचा उपमा \ Corn Upma | Corn Upma
साहित्य : 3 मक्याच्या कणसाची कोवळे दाणे चवीनुसार मीठ चवीनुसार साखर ( आवडत असेल तर ) १ चमचा लाल मिरची पावडर २-३ चमचे शेंगदाण्य...
https://sheplansdinner.blogspot.com/2018/10/corn-upma-corn-upma.html
- 3 मक्याच्या कणसाची कोवळे दाणे
- चवीनुसार मीठ
- चवीनुसार साखर ( आवडत असेल तर )
- १ चमचा लाल मिरची पावडर
- २-३ चमचे शेंगदाण्याचे कुट
- कोथिंबीर बारीक चिरलेली
फोडणीसाठी
- २ चमचा तेल
- १ चमचा जिरे
- कढिपत्ता
- चिमुटभर हिंग
- १/२ हळद
कृती :
- मक्याचे कोवळे दाणे फ़ूड प्रोसेसर/ मिक्सर मधून बारीक करुन घ्यावे
- मक्याचा खिस मध्ये मीठ, साखर आणि दाण्याचे कुट,मिरची पावडर घालुन छान एकत्र करावे
- आता तेलाची खमंग फ़ोडणी करुन त्यात जिरे, कढीपत्ता ,हिंग हळद घालावे घालावेत.
- आता वरील सगळे साहित्य एकत्र केलेले मक्याच्या खिसाचे मिश्रण घालावे आणि फोडणीमध्ये छान एकसारखे करावे
- झाकण ठेवुन मंद आचेवर ५-७ मिनिट शिजु द्यावे.
- आपला मक्याच्या दाण्याचा उपमा तयार झाला आहे
- खाताना दही सोबत खायला दिला तर अजून जास्त टेस्टी लागतो .
लहान मुल आवडीने खातात ..