मसाला दुध | Masala milk |कोजागिरी स्पेशल रेसिपी
साहित्य: १/२ लिटर दुध ५ चमचे साखर बारीक चिरलेले बदाम ,पिस्ता काप १ चिमूटभर केशर मसाल्यासाठी साहित्य: २५ gram बदाम २५ ग्रम पिस्ता...
https://sheplansdinner.blogspot.com/2018/10/masala-milk.html
साहित्य:
१/२ लिटर दुध
५ चमचे साखर
बारीक चिरलेले बदाम ,पिस्ता काप
१ चिमूटभर केशर
मसाल्यासाठी साहित्य:२५ gram बदाम
२५ ग्रम पिस्ता (साल काढलेले )
२५ ग्रम काजू
१०-१२ वेलदोडे (साल काढून दाणे घ्यावे )
१/२ tbsp जायफळ पूड
घरी मसाला तयार करायचा नसेल तर बाजारात सुहाना केशरी दुध मसाला मिळतो तो आणावा
कृती :
मसाला बनवाण्यासाठी :
१) बदाम ,काजू ,पिस्ता कढई मध्ये हलके भाजून घ्यावे नंतर त्यामध्ये वेलदोडे दाणे २-३ मिनिट हलके गरम करावे .२) वरील मिश्रण थंड झाल कि त्यामध्ये जायफळ पावडर घालून मिक्सर वरून बारीक करून घ्यावे आपला मसाला दुध पावडर तयार आहे .
मसाला दुध बनवण्यासाठी:
१) दुध गरम करायला ठेवावे
२) दुध गरम झाले ,त्याला पहिली उकळी आली कि चमच्याने /पळीने चांगले ढवळावे .
३) त्यानंतर त्यामध्ये ५ चमचे साखर घालावी .२ चमचे दुध मसाला पावडर,आणि केशर घालावे
४) ४-५ मिनिट दुध चांगले उखळावे .
५) केशर चा मस्त रंग दुधाला येतो .
सर्व्ह करताना दुधामध्ये वरून बदमा ,पिस्ता चे बारीक काप घालावे आणि केशरही घालावे .
Sports toto - the latest sports toto for you at Sporting100
ReplyDeleteSporting 100 is your home for the latest sports news and betting information. Don't miss our exciting sports tips for your favorite sport and 오래된 토토 사이트 competitions.