तूरडाळआमटी| तूरडाळ रस्सम |तूरडाळ soup | She Plans Dinner

तूरडाळआमटी| तूरडाळ रस्सम |तूरडाळ soup

Turdal Rasam/ Turdal Aamti Recipe in English तूरडाळ आमटी/ तूरडाळ रस्सम साहित्य: 1)1/2 वाटी कुकरला शिजवून घेतलेली तूरडाळ ...


तूरडाळ आमटी/ तूरडाळ रस्सम
साहित्य:
1)1/2 वाटी कुकरला शिजवून घेतलेली तूरडाळ
2)1 टोमॅटो बारीक चिरून
3)1 छोटा कांदा बारीक चिरून
4)1 चमचा लाल तिखट
5)1 चमचा गोडा मसाला
6)आमसूल 4
7)गूळ खडा
8)1 चमचा मीठ
9)1 चमचा आलं लसूण पेस्ट
फोडणीसाठी
1)1 चमचा तेल
2) 1/2 मोहरी
3)1/2 जिरे
4)हिंग
5)हळद
6) कडीपत्ता


कृती:
1)सगळ्यात पाहिले फोडणी करून घ्यावी.
1चमचा
तेल गरम करावे त्यात मोहरी घालावी मोहरी तडतडली की जिरे ,हिंग,हळद कडीपत्ता घालून चांगलं हलवावे.
2)त्यानंतर आलं लसूण पेस्ट ,कांदा टोमॅटो घालून चांगलं मिश्रण हलवावे.
3) त्यात थोडंस लाल तिखट घालावे.
आणि 2 मिनिटं मिश्रण चांगले शिजून द्यावे.
4)2-3 वाट्या पाणी घालावे
3)नंतरलाल तिखट,मीठ गोडा मसाला,आमसूल,गुळ घालून रस्सम चांगले उखळावे.
उखळण्यानंतर हे बनली आपली तूरडाळ आमटी /तूरडाळ रस्सम.
भाकरी ,चपाती ,भात सोबत खूप छान लागतेच

पण south indian रेसिपी सोबत ही छान लागते.



Related

Veg Recipe 3761978559883982144

Post a Comment

emo-but-icon

Subscribe My Youtube Channel

Follow Us On Facebook

Like, Follow & Visit Us :

Instagram

Search Recipe Here

Popular

Recent

item