लाल भोपळ्याची भाजी / Red Pumpkin Bhaji / Lal Bhoplya Chi Bhaji
Red Pumpkin Bhaji / Lal Bhoplya Chi Bhaji in English Visit & Subscribe She plans Dinner Recipe Channel साहित्य: १/२ किल...

Red Pumpkin Bhaji / Lal Bhoplya Chi Bhaji in English
Visit & Subscribe She plans Dinner Recipe Channel
साहित्य:
- १/२ किलो लाल भोपळा, सोलून चौकोनी तुकडे करून
- १ टिस्पून लाल तिखट
- २ टिस्पून गोडा मसाला
- १ टिस्पून किसलेला गूळ
- चवीपुरते मिठ चिरलेली कोथिंबीर
फोडणीसाठी-
- 2 टिस्पून तेल,
- 1 टिस्पून मोहोरी,
- १/४ टिस्पून जिरे,
- चिमूटभर हिंग,
- १/४ टिस्पून हळद,
- ७-८ कडीपत्ता पाने
Visit & Subscribe She plans Dinner Recipe Channel
कृती:
१) कढई मध्ये तेल गरम करून मोहोरी, कडीपत्ता , जिरे, हिंग, हळद, घालून फोडणी करावी. त्यात चिरलेला भोपळा घालून निट मिक्स करावे.२) त्यानंतर लाल तिखट ,गोड मसाला ,मीठ गुळ घालून भाजी चांगली हलवून घ्यावी .भाजी चांगली मिक्स करून त्यानंतर पातेल्यावर झाकण ठेवून मंद आचेवर वाफ काढावी.
३) भोपळा शिजण्यासाठी १/४ कप पाणी घालावे. भोपळा आणि भाजी झाकण ठेवून चांगली शिजवून घ्यावी .
४) भोपळा भाजी चांगली शिजली कि वरून कोथिंबीर घालावी .आणि पोळीबरोबर सर्व्ह करावे.