हिरव्या कच्च्या टोमॅटो ची चटणी / Raw green tomato chutney | She Plans Dinner

हिरव्या कच्च्या टोमॅटो ची चटणी / Raw green tomato chutney

Raw green tomato chutney in English साहित्य :  1) 2-3 हिरवे टोमॅटो , 2) 4-5 चमचे  शेंगदाणे , ३) पाव चमचा  तीळ , ४)  कोथिंबीर, ...

Raw green tomato chutney in English



साहित्य : 
1) 2-3 हिरवे टोमॅटो ,
2) 4-5 चमचे  शेंगदाणे ,
३) पाव चमचा  तीळ ,
४)  कोथिंबीर,
५ )४-५ हिरव्या मिरच्या,
६) साखर 
७ ) चवीनुसार  मीठ,
८)लिंबू

फोडणीसाठी गरजेनुसार तेल, हिंग, जिरे, मोहरी व हळद

कृती :

१) हिरवे टोमॅटो चिरून बारीक तुकडे करावे .हिरव्या  मिरचीचेहि तुकडे करून घ्यावेत .
२) तवा किंवा कढई गरम करायला ठेवावी .त्या मध्ये टोमॅटो,मिरची तुकडे,शेंगदाणे , तेल घालून भाजून ,परतून घ्यावे .
३) त्यानंतर तीळ घालून अजून २ मिनिट परतावे 
४) हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यावे .5-10 मिनिट थंड होऊ द्यावे 
५) त्यानंतर त्या मध्ये चवीनुसार मीठ ,साखर  घालावे 
६) चवीनुसार लिंबू  पिळावा आणि मिक्सर वरून वाटून घ्यावे .
७) त्यानंतर फोडणी करावी .तेल गरम करून त्यामध्ये हिंग, जिरे, मोहरी व हळद घालावे .
८) वरील मिक्सर वरून काढलेले मिश्रण एका बाउल मध्ये घेऊन फोडणीचा तडका द्यावा .
९) आपली हिरव्या कच्च्या टोमॅटो ची चटणी तयार झाली आहे .

ही कच्च्या टोमटोची चविष्ट चटणी ब्रेडच्या स्लाइसला लावून चटणी सँडविच बनवावेत,फारच छान लागतात.




Related

Tikhat 3231129048916004717

Post a Comment

emo-but-icon

Subscribe My Youtube Channel

Follow Us On Facebook

Like, Follow & Visit Us :

Instagram

Search Recipe Here

Popular

Recent

Blog Archive

item