भेंडीच भरीत / Bhindi bharit
साहित्य : १) २५० ग्रम कोवळी भेंडी २) १ चमचा मीठ ३) १ चमचा साखर ४) 1/2 वाटी शेंगदाण्याचे कुट ५ )१/२ वाटी दही ६) २ मिरची ७) कडीपत्त...
https://sheplansdinner.blogspot.com/2013/09/blog-post_9274.html
साहित्य :
१) २५० ग्रम कोवळी भेंडी
२) १ चमचा मीठ
३) १ चमचा साखर
४) 1/2 वाटी शेंगदाण्याचे कुट
५ )१/२ वाटी दही
६) २ मिरची
७) कडीपत्ता
फोडणीसाठी :तेल , मोहरी ,हिंग, जिरे ,हळद
कृती :
१) भेंडी स्वच्छ धुवून ,पुसून ,कोरडी करून घ्यावी .
२) अर्ध्या तासानंतर चिरून घ्यावी
३) एका कढईमध्ये चिरलेली भेंडी त्यावर २ चमचे तेल घालून भेंडी चांगली भाजून घ्यावी
भेंडी चांगली भाजून घेतली कि एका बाऊल मध्ये काढून घ्यावी .
४) भाजलेल्या भेंडीवर ,मीठ ,साखर ,शेंगदाण्याचे कुट घालावे .चांगल मिक्स करून घ्यावे .
५)छोटी कढई घेऊन त्यात तेल गरम करावे त्यात मोहरी ,हिंग, जिरे ,हळद,कडीपत्ता ,मिरची कट करून घालावे
हि फोडणी भेंडीच्या वरील मिश्रणावर घालून ,फोडणी चांगली मिक्स करावी
६)सगळ्यात शेवटी दही घालून भरीत चांगले हलवावे .
७ )आपले भेंडीचे भरीत तयार झाले .
हे भेंडीचे भरीत भाकरी सोबत ,चपाती सोबत सुंदर लागते .