रताळ्याचा शिरा / Sweet Potato Sheera
साहित्य- १ .सव्वा वाटी किसलेलं रताळं, २.दोन कप दूध, ३.दोन चमचे साजूक तूप, ४.तीन चमचे साखर, ५ पाव चमचा वेलची पूड, ६.काजू- ...
https://sheplansdinner.blogspot.com/2013/09/blog-post_8394.html
साहित्य-
१ .सव्वा वाटी किसलेलं रताळं,
२.दोन कप दूध,
३.दोन चमचे साजूक तूप,
४.तीन चमचे साखर,
५ पाव चमचा वेलची पूड,
६.काजू- बदामाचे काप
कृती -
१.आधी रताळं सोलून आणि बारीक किसून घ्यावं.
२ .एका कढईत तूप गरम करावं, यात किसलेलं रताळं घालून नीट परतून घ्यावं.
३.त्याचा रंग जरा बदलल्यावर त्यात दूध घालावं आणि एक उकळी येऊ द्यावी.
४.उकळी आल्यानंतर त्यात साखर घालावी. आता हे मिश्रण नीट ढवळून एकत्र करून घ्यावं.
५.या दुधात रताळं नीट शिजायला हवं. वेलची पूड आणि काजू-बदामाचे काप घालावेत.
६.त्याला एक हलकीशी वाफ आल्यावर गॅस बंद करावा.
टीप :
१)आवडत असल्यास दोन चमचे ताजा खोवलेला नारळ रताळ शिजत आल्यावर घालाव.
२ .हा शिरा कोरडा करण्यापेक्षा जरा ओलसरच करावा. रताळं किसायला वेळ नसेल तरी हरकत नाही. ते उकडून मग कुस्करून घेतलं तरीही चालेल.