मुळ्याची कोशिंबीर / White Radish Salad /Moolangi kosambari |
Radish Salad | Mulyachi Koshimbir Recipe In English साहित्य : १) २-३ मुळे २) शेंगदाण्याच कुठ ३) १ चमचा मीठ ४) १ चमचा साखर ५) पाव...
https://sheplansdinner.blogspot.com/2013/09/blog-post_8662.html
Radish Salad | Mulyachi Koshimbir Recipe In English
साहित्य :
१) २-३ मुळे
२) शेंगदाण्याच कुठ
३) १ चमचा मीठ
४) १ चमचा साखर
५) पाव चमचा मिरची पावडर
६ ) लिंबू
फोडणीसाठी
१) २-३ चमचे तेल
२)मोहरी
३) जिरे
४) हिंग
६) कडीपत्ता
कृती :
१) मुळे स्वच्छ धुवून ,वरची साल कडून खिसणीने खिसून घ्यावे
२) खिसून घेतलेल्या मुळ्याचा खीस पिळून घ्यावा कारण खिसल्यानंतर त्याला पाणी सुटतं.
३) त्यानंतर त्यामध्ये मीठ ,साखर ,शेंगदाण्याच कुठ ,मिरची पावडर घालावे
थोडा चवीनुसार लिंबू पिळून मिश्रण चमच्याने एकत्र करून घ्यावे .
४) छोट्या कढई मध्ये तेल गरम करावे मोहरी तडतडली कि त्यात जिरे ,हिंग ,कडीपत्ता घालून फोडणी करावी .
५ ) फोडणी थंड करून वरील मिश्रणावर घालावी .
आपली मुळ्याची कोशिंबीर तयार झाली .
मुळ्याची कोशिंबीर भाकरी ,चपाती सोबत छान लागते .
टीप :
१) लाल मिरची ऐवजी मिरची फोडणी मध्ये घालू शकता .
२) लिंबू ऐवजी दही हि घालू शकता .